Posts

Showing posts from July, 2023

तू

तू   निर्झराचा तोल तू   डोहाहून खोल तू   धुंद लाटेच्या लयीचा   उसळता निश्वास तू गर्द रानी मोह तू   धुक्यासम अवरोह तू   सोनचाफ्याच्या कळीचा   धुंद मंद सुवास तू   इन्द्रधनुचे जाल तू   वसंताचा ख्याल तू   पश्चिमेचे रंगगहिरे   उसळते आभाळ तू   पारव्याची साद तू   घनाचा पडसाद तू   गंधवेड्या उष्ण देही   विजेचा उन्माद तू   अंबराची आस तू   चांदण्याचा श्वास तू   मेघवेडी मी अशी अन्   पावसाचा भास तू   तेज तू शीतलही तू   शुभ्र तू शामलही तू   गुन्तल्या वेलीच माझ्या   मुक्त अन् स्वच्छंद तू   प्राणसखया जीव तुजवर   मुक्त हाती अर्पिला   वीण ज्याची सोडवेना   सुखद तो सहवास तू कोण कुठली राहिले   तुझीच , तुजला वाहिले अंतरात नित्य आता   तूच मी अन् मीच तू   - सायली