निर्झराचा तोल तू
डोहाहून खोल तू
धुंद लाटेच्या लयीचा
उसळता निश्वास तू
गर्द रानी मोह तू
धुक्यासम अवरोह तू
सोनचाफ्याच्या कळीचा
धुंद मंद सुवास तू
इन्द्रधनुचे जाल तू
वसंताचा ख्याल तू
पश्चिमेचे रंगगहिरे
उसळते आभाळ तू
पारव्याची साद तू
घनाचा पडसाद तू
गंधवेड्या उष्ण देही
विजेचा उन्माद तू
अंबराची आस तू
चांदण्याचा श्वास तू
मेघवेडी मी अशी अन्
पावसाचा भास तू
तेज तू शीतलही तू
शुभ्र तू शामलही तू
गुन्तल्या वेलीच माझ्या
मुक्त अन् स्वच्छंद तू
प्राणसखया जीव तुजवर
मुक्त हाती अर्पिला
वीण ज्याची सोडवेना
सुखद तो सहवास तू
कोण कुठली राहिले
तुझीच, तुजला वाहिले
अंतरात नित्य आता
तूच मी अन् मीच तू
- सायली
17 comments:
खूप छान सायली. प्रत्येक ओळ मनाला भिडणारी आहे.
सायली तू मधून तू खूप छान व्यक्त झाली आहे
सायली
किती सुंदर व्यक्त झालीस तू
लिहीत रहा अशीच तू
❤️❤️❤️
👌👌 सुदंर
वाह
गंधवेड्या उष्ण देही... सुंदर
सुंदर..अप्रतिम"
नितांत सुंदर समर्पणभाव असणारी कविता.. खूप छान!!
अ प्र ति म!! अशीच लिहीत रहा!
अग!!किती सुंदर ,अप्रतिम किती शब्द भांडार
Sayali khup chan lihala aahes shbdanch bhandar ch ughadlas
खूप सुंदर कविता ! You have wealth of words
फारच छान !!
सुरेख.
अतिशय सुंदर....शेवटच्या ओळी फारच अवडल्या...तूच मी अन मीच तू... beautiful
खूप छान! लिहित रहा!!!
Wow!! Beautifully written!! Sayali, loved reading it!😇😇👌
Post a Comment