अत्तरापरी उडून जाई
क्षण जरी फिरूनी हाती न येई
मोहक मादक मधुर साजिरी
स्मरणकुपी ती भरून वाही
त्यात असे एक नाजूक कप्पा
अलगद रचल्या आठवणींचा
हलकी फुंकर पुरे उकलण्या
सडा गुलाबी मधुगंधाचा
साठवली त्या खोल तळाशी
तुझी नि माझी अबोल प्रीति
वळून मागे पाहू जाता
गाठ तुझ्याशी अखंड होती
सखे तुझ्यातच पाहत आलो
ऋतू सुखाचे, दिवस कळ्यांचे
तुझ्यामुळे तर रिचवू शकलो
घोट नकोशा वास्तवतेचे
तूच दिल्या स्वप्नांना वाटा
तूच उभारी श्रांत मनाला
निराश होता कोलाहली या
तूच विसावा आर्त जिवाला
स्मरण अता हे उरले हाती
तीच शिदोरी सोबत माझी
जुन्या क्षणांचा अमूल्य ऐवज
वाटेवरचा प्रकाश होई
- सायली
10 comments:
बंद खोलीमध्ये झरोक्यातून एक सूर्यकिरण येतो आणि अंधारलेल्या खोलीला प्रकाशमय करतो तसच काहीसं झालं हे वाचताना ...
तुझं लिखाण साधं सोपं पुन्हा पुन्हा वाचून मनाला तृप्त करणारं आहे.
सुंदर शब्दकळा! अस्सल मराठी साज. थोडे केशवसुत, थोडे कुसुमाग्रज अशी आठवण आली. प्रथमवचनी कविता भिन्न लिंगाधारित लिहिणे हे सध्या तुलनेने दुर्मिळ आहे. लिहिती रहा..
गेल्या लेखाप्रमाणे ही कविता सुंदर आहे
खूप सुंदर लिहिले आहेस...असेच छान लिखाण सुरू ठेव..
Keep writting
Loved this
सुंदर
छान, अर्थपूर्ण 👍🏻
Wow, bhari 👌
👌👌👌
Vaah
Post a Comment