नातं
तसे पहायला गेले तर हे दोघे अखंड सोबत
दोघेही मनस्वी, स्वछंदी आहेत
पण जमलेले आहेत त्यांचे सूर
एक तो, अथांग ओलावा घेऊन जगणारा
कधी उधाणून, आनंदाच्या गर्जना करत फेसाळणारा
तर कधी निशब्द हलक्या तरंगानी माया दाखवणारा
आणि एक धगधगता, धुमसता
कधी तापवून अक्षरशः गुदमरवून टाकणारा
तर कधी थापटण्याहून हलकी वाटावी अशी ऊब देणारा
त्यांचं ते समजून घेतात एकमेकांना, उमजून चालतात अहोरात्र
मध्ये रात्रीपुरता विरह, जो नित्यनियमाने येणारा
ही ताटातूट केवळ तात्पुरती, काही काळापुरती आणि निश्चितपणे संपणारी आहे हे दोघे जाणून असतात
त्या काळात ते आपापली वाट आक्रमत राहतात, पण साथ सोडत नाहीत
कधी कधी मात्र निरोपाच्या वेळी असा नेमका संदेहाचा ढग येतो मध्ये
निरोपाशिवायच दिवस संपतो
सकाळची प्रतीक्षा रात्रीला नको तेवढी लांबवते
त्या सगळयात एकमेकांच्या साथीची ओढ मात्र अजूनच घट्ट झालेली असते, त्या ढगाच्याही नकळत
खऱ्या अंतरीच्या नात्यांचंही असंच होतं ना ?

Comments
खूप छान गणित मांडलं आहेस ग 👌👍👏👏
खऱ्या अंतरीच्या नात्यांचंही असंच होतं ना?
हो, अगदी, अगदी तसंच होतं...
अंतरीच्या नात्यांचीही
पोकळी विदीर्ण आहे
काय सांगू कविते तुला मी
ओढ आपुली जीर्ण आहे
-- शब्द.
#प्रतिभाविष्कार.