Posts

बोनसाय (भाग 1)

     शिफ्ट व्हायचा दिवस जसा जसा जवळ येत होता तशी मानसीची आणखीनच धांदल उडत होती . परक्या देशात आधी कुठे रुळणं अवघड , त्यात असं अचानक उठून एकदम २५०० मैल लांबच्या नवीन शहरात जायचं म्हणजे खरं तर तिला नकोच वाटत होतं . पण विनयला नोकरी बदलणं भाग होतं . हा निर्णय घेतला उणापुरा महिना होता हातात सगळी तयारी करायला . आता सगळी कामं खरं म्हणजे संपत आली होती , विमानाने जाताना बरोबर न्यायचं बारीक सारीक सामान भरायचं उरलं होतं .    सकाळीच मूव्हिंग कंपनीचे लोक येऊन सगळं सामान पॅक करून एका मोठ्या   ट्रक मध्ये लोड करुन गेले होते . आता उद्या सकाळी एअरपोर्टला जाताना गाड्या त्यांच्या ताब्यात दिल्या की फिलाडेल्फियाला शेवटचा गुड्बाय म्हणायला मोकळे .        अंगणातल्या झाडांना एकदा पाणी घालून घेते असं म्हणून मानसी घराबाहेर पडली . तिनं मायेनं वाढवलेल्या या गोतावळ्याशी हितगुज करायला एक शेवटची संध्याकाळ उरली होती . नेहमीच्या सवयीप्रमाणे ती आधी मेपलट्र...

आठवण

आठवण  अत्तरापरी उडून जाई  क्षण जरी फिरूनी हाती न येई  मोहक मादक मधुर साजिरी स्मरणकुपी ती भरून वाही  त्यात असे एक नाजूक कप्पा  अलगद रचल्या आठवणींचा  हलकी फुंकर पुरे उकलण्या   सडा गुलाबी मधुगंधाचा  साठवली त्या खोल तळाशी  तुझी नि माझी अबोल प्रीति वळून मागे पाहू जाता  गाठ तुझ्याशी अखंड होती  सखे तुझ्यातच पाहत आलो  ऋतू सुखाचे, दिवस कळ्यांचे  तुझ्यामुळे तर रिचवू शकलो  घोट नकोशा वास्तवतेचे  तूच दिल्या स्वप्नांना वाटा  तूच उभारी श्रांत मनाला  निराश होता कोलाहली या  तूच विसावा आर्त जिवाला  स्मरण अता हे उरले हाती  तीच शिदोरी सोबत माझी  जुन्या क्षणांचा अमूल्य ऐवज  वाटेवरचा प्रकाश होई  - सायली

या नि:शब्दाचा नाद कोणता ?

     काही महिन्यांपूर्वी ' काळोखाचा रंग कोणता ' हे गाणं पहिल्यांदा ऐकलं . सुरुवातीला केवळ एक कलाकृती म्हणून ऐकलं , आवडलंही . पण मग   जरा विस्मृतीत गेलं . गेल्या काही दिवसात मात्र पुन्हा काही कारणाने तेच शब्द ऐकावेसे वाटले आणि तेव्हा ते नव्याने भावलं . किती सुंदर आणि निर्मळ पद्धतीने त्या शब्दात मनाची एक अत्यंत अवघड अवस्था व्यक्त केलेली आहे .  नेमकं सांगायचं तर डिप्रेशन , आणि त्या गर्तेत गेलेली व्यक्ती उभी राहिली डोळ्यासमोर .   लखलखणार्‍या लाख दिव्यांनी झगमगणारी धरती एकही तारा इथे दिसेनाका आकाशी वरती वाट हरवता वाटसरूला दिशा कशी समजावी ? ध्रुव बाळाच्या अढळपदाची गोष्ट कुणा उमजावी ? सारे काही ढळलेले, डळमळलेले, गोंधळलेले काही कळेना कुठे चालले रस्ते सारे वळलेले शेवट कुठला मध्य कुठे प्रारंभ कोणता ? या अवस्थेमध्ये कशातच मन रमत नाही .  ना कामात , ना आपल्या छंदात .. ज्या गोष्टी   आपल्याला कायम आनंद देत आल्या त्याही अगदी नीरस वाटायला लागतात . घरातल्या इतरांचे , आसपासच्या   लोक...